अकोला : अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांची अभ्यासपूर्ण विश्लेषण व प्रखर वक्ता व प्रत्येक विषयाची छान मांडणी ची दखल प्रदेश भाजपा ने घेऊन महाराष्ट्रात 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत 38 ठिकाणी 23 प्रदेश थरातील वक्त्यांची नावे काढून त्यांना जबाबदारी दिली आहे यामध्ये अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्याकडे दोन जिल्ह्याची जबाबदारी देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे आमदार रणधिर भाऊ सावरकर ग्रामीण नेतृत्व तसेच उद्योजक अभियंता शेतकरी व सर्वसामान्यांशी नाळ जुळलेले लोकनेते म्हणून व युवा लोकप्रतिनिधी म्हणून तसेच प्रखरपणे अभ्यासपूर्ण पाठपुरावा म्हणून करणारे लोकप्रतिनिधी कुशल संघटक म्हणून त्यांनी वेगळं स्थान निर्माण केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात 28 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर योजनेच्या प्रचार प्रसाद तसेच सर्वसामान्य कार्यकर्ते व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची संवाद साधण्यासाठी अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्याकडे यवतमाळ वर्धा जिल्ह्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे या जिल्ह्यातील जवळपास पाच हजार लोकांशी ऑनलाइन तसेच वेगवेगळ्या माध्यमातून आमदार सावरकर संपर्क साधणार आहेत