अकोला,दि. 28 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 144 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- पातूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोला ग्रामिण येथे 25 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अकोट येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे 14 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही, 37 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 39 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 144 चाचण्यांमध्ये 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 17090 चाचण्या झाल्या त्यात 1205 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.