अकोला,दि. 28 (जिमाका)- ‘नो मास्क, नो सर्व्हीस’ ही मोहिम जिल्ह्यात एकत्रीत प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी झूमव्दारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकीचे मुख्यधिकारी व इतर संबंधित यंत्रणेशी संवाद साधून निर्देश दिलेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांची उपस्थिती होती.
संपूर्ण जिल्ह्यात आज दि. 29 पासून या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक नगरपालिकेने वार्डनिहाय व ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक नागरिकांने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. मास्कचा वापर न करण्याऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सेवा देताना सेवा देणाऱ्यांनी व सेवा घेणाऱ्यांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात सर्व आस्थापना, दुकाने, प्रतिष्ठाने व पेट्रोल पंप आदि सुरु करण्यात आले आहे. यामुळे लोकांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग होणाचे प्रमाण वाढले आहे. यासाठी मास्कचा वापर करणे तसेच सामाजिक अंतर राखणे यासारख्या उपाययोजना नागरिकांनी कठोरपणे वापरणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पेट्रोल पंपावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अनिवार्य आहे. तसेच शासकीय कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी बिना मास्क येणार नाही यांची काळजी कार्यालय प्रमुखानी घेवून ‘नो मास्क, नो सर्व्हिसचा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मास्क वापरण्याबद्दल प्रत्येकाला बाध्य करावे. कापड, धान्य, किरणा, भाजी विक्रेता यांनी स्वत: मास्कचा वापर करुन प्रत्येक ग्राहकाला मास्क शिवाय सेवा देवू नये असे निर्देश दिले.
2 ऑक्टोंबर पासून इम्युनिटी बुस्टर पंधरवाडा राबविणार
नागरिकांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोविड-19 चा मुकाबला करणे शक्य आहे. यासाठी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली 2 ऑक्टोंबरपासून इम्यूनिटी बुस्टर पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करावयात या संबंधितेचे घडीपत्रीकाचे वितरण घरोघरी करण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व तहसिलदार, नगरपालिका मुख्यधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांनी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ हा मा. मुख्यमंत्री यांची महत्वाकांक्षी मोहिम असून या मोहिमेमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी सक्रीय सहभाग घेवून संदिग्ध रुग्ण व कोमाब्रीड रुग्णांची 100 टक्के तपासणी होईल यासाठी जातीने लक्ष घालावे, असे सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्यात. माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेची माहिती 100 टक्के ॲपव्दारे ऑनलाईन भरावी, अशा सूचना दिल्यात. होमक्वॉरटाईन झालेले रुग्ण बाहेर फिरत असताना आढळत असल्याच्या तक्रारी येत आहे. यासाठी अशा रुग्णावर प्रत्यक्ष लक्ष ठेवावे. बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई करावी, असा सूचना दिल्या. मृत्यू पावलेल्या कुटूंबातील तसेच आजूबाजूच्या कुटूंबाचे कोविड तपासणी करुन घ्यावी. तसेच स्मशानघाट व कब्रस्थान येथे अत्यंविधीसाठी येणाऱ्यांचा डाटा ठेवावा. शहराला लागून असलेल्या गावात मोठया प्रमाणात कोविडचे रुग्ण आढळत आहे. तरी अशा ठिकाणी जास्तीजास्त कोविड तपासणीचे शिबीर घेण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.