अकोट(देवानंद खिरकर)- मा.आमदार अमोल मिटकरी यांनी कष्टकरी कै. वडिलांच्या द्वितीय पुण्य स्मरण दिनी ही रुग्णवाहिका रुग्ण सेवेत समर्पित करण्याचे ठरविले आहे.ज्या वडिलांनी गरीब परिस्थितीशी संघर्ष करत जीवनाचा प्रवास केला त्यांचेच आरोग्य सेवेचे असलेले स्वप्न आज पूर्ण करत मा.अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी आपल्या आमदार विकास निधी मधून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी 20 लक्ष.रु ची रुग्णवाहिका देऊन सेवा,त्याग,समर्पणाची मशाल त्यांनी तेवत ठेवली आहे.