अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 126 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, पातूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 10 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला, 57 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 33 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 126 चाचण्यांमध्ये 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 16641 चाचण्या झाल्या त्यात 1127 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.