अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 201 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण येथे 51 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर व पातूर येथे आज चाचण्या झाल्या नाही, बार्शीटाकळी येथे 14 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 53 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 15 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला, 45 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 201 चाचण्यांमध्ये 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 16515 चाचण्या झाल्या त्यात 1117 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.