अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 210 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, बाळापूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तर अकोट येथे 13 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला. पातुर येथे 109 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेल्हारा येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही, 72 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार चाचण्या झाल्या त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात 210 चाचण्यांमध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 16174 चाचण्या झाल्या त्यात 1092 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.