अकोला(प्रदिप कोलटक्के) – चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाणे गजबजलेल्या वर्गासमोर उभे राहून अध्यापन करणारे शिक्षक हे चित्र सद्या कोरोना मुळे पालटले आहे. त्या ऐवजी घरात अथवा शाळेतील वर्गामध्ये एक मेव गुरुजी मोबाईल च्या सहाय्याने विद्यार्थीचा अभ्यास घेत असल्याचे चित्र दिसत आहे. पलीकडून सर… मॅडम… आवाज येत नाही… परत सांगा कि.. असा आवाज देत घरामधून एकाला मिळत आहे.
मुले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. कधी नेटवर्क नाही तर कधी शिक्षकांचा आवाज येत नसल्याने या आॅनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा होतांना दिसत आहे. त्यामुळे शिक्षणाचे तिन तेरा वाजतात कि काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोना मुळे वार्षिक परीक्षेच्या आधीचा मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला उन्हाळ्याच्या सुट्टया संपल्यानंतर 15 जुनला शाळा उघडतात मात्र आज उद्या, करता करता निम्मा सप्टेंबर महिना संपला तरी शाळा सुरू होणार की नाही हा संभ्रम पाल्यांना होता. दिवाळी नंतरच शाळा सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने निम्मे सत्र विद्यार्थींना घरातच काढावे लागत आहे. विद्यार्थ्यांना घर बसल्या शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला असून व्हाॅटसप,आणि गुगल, मिटर वर विद्यार्थींचे आॅनलाईन शिक्षण सुरू झाल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.
कोरोना वर मात करुन विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचे वर्षे वाया जाऊ नये, त्या साठी तारेवरची कसरत आई -वडीलांना करावी लागत आहे कोरोना च्या पाश्र्वभूमीवर सुरु असलेले आॅनलाईन वर्ग सुरु करण्यात आले आहे. शाळा बंद शिक्षण सुरू हा उपक्रम शहरासह ग्रामीण भागात गावोगावी पहायला मिळत आहे. या उपक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांना अडचणी असल्या तरी त्या शिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मार्च 2019 पर्यंत आई- वडील मुलांना मोबाईल फोन पासुन दुर राहण्याचे धडे देत असत पण, आई – वडीलांना काय माहीत कि कोरोना या मारामारीत हाच मोबाईल फोन एक दिवस आवश्यक ठरणार आहे. अभ्यासाच्या धाकाने मुल – मुली मोबाईल फोन वर गेम व चॅट करित असत पण आता चित्र वेगळ पहायला मिळत आहे. कधी काळ गेम खेळणारा मोबाईल फोन आता अभ्सासाठी वापरल्या जाईल असा विद्यार्थ्यांना सुद्धा वाटल नसेल काही विद्यार्थी अजुनही अभ्यासाचे निमित्य साधून संधी च सोन करण्याच्या फिराक मध्ये असतात.
गरिब परिवारांचे चित्रच या कोरोना ने बदलून टाकले आहे. च्यार महिने हाताला काम नव्हते नंतर पावसाळ्याचे दिवस आले कर्ज बाजारी होऊन मुलांना कपडे, पुस्तके, बुट घेऊन पैसा खर्च करून बसले मोल मजुरी करुन मुला बाळांना शिक्षण देणे काही या काळात जेवढे पाहिजे तेवढे सोपे नाही आणि आता आॅनलाईन शिक्षणासाठी एॅनराॅईड फोन घेणे म्हणजे एकादशी जवळ शिवरात्रि अश्या घोर संकटात जणु गरिबांची थट्टा च झाली 10 ते 15 हजार रुपये कोठून आणायचे हाताला पहिजे तसे काम नाही वर आॅनलाईन शिक्षण मुलांना कशे शिकवायचे आपल्याला मोबाईल फोन समजत नाही अश्या परिस्थितीत खचून न जाता मुला बाळांसाठी नवीन फोन घेणे म्हणजे गरिबांवर फार मोठ संकट या कोरोना ने आणुन टाकल, मजुर वर्गाने अहो रात्र मेहनत करुन मुलांना फोन घेऊन दिले ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा खरच खेळखंडोबा झाल्याच चित्र पहावयास मिळत आहे परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते म्हणतात पण शिक्षणाने परीस्थितीला शिकवले, ग्रामीण भागात शिक्षणाचा खरच खेळखंडोबा होत चाललायका हो?
प्रतिक्रिया
अनेक पालका कडे एॅनराॅईड मोबाईल नाहीत मोबाईल आहे तर रेंज नाही रेंज आली तर लाईन नाही अश्या परिस्थितीत ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे
[ श्री प्रविण डींकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस अकोला ]