अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 204 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, व बाळापूर, येथे चाचण्या झाल्या नाही. तर अकोट येथे 52 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे 15 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पातुर येथे 36 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेल्हारा येथे 11 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुर्तिजापूर येथे दोन चाचण्या झालया. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे आठ चाचण्या झाल्या. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. 44 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 36 चाचण्या झाल्या त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात 204 चाचण्यांमध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 15964 चाचण्या झाल्या त्यात 1084 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.