पातूर (सुनिल गाडगे) : महाराष्ट्रातील राजकारणात सद्यस्थित असलेली प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून वंचितांना सत्तेत स्थान देऊन त्यांना सामाजीक,राजकीय क्षेत्रात उदयोन्मुख करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रास्थितांच्या मक्तेदारीने जीवनभर कार्यकर्ताच ठेवले,केवळ ज्यांचा वशिला नव्हता म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला अश्या कार्यकर्त्यांना राजकीय मान मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीचा पर्याय खुला करून दिला.
आज दि.20/09/2020 ला स्थानिक संत सेवालाल महाराज भवन येथे
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या नेतृतावर विश्वास दाखवत पप्पु उर्फ नरेंद्र चावरिया (शिवसेना), देउळगाव उपसरपंच खुशाल डाबेराव (शिवसेना),हरिचंद्र धारपवार(मनसे),रामदास मेसरे (राष्ट्रवादी काँग्रेस),समाधान पजई (छावा),विलास झोडपे (छावा),गोपाल पांडे,माणिक पजई,सदाशिव झोडपे,विजय रामकृष्ण बोचरे,मनोहर झोडपे,सहदेव कवळे,नंदलाल कुरई,जितेंद्र कुरई,निखिल रामकृष्ण खंडारे, मनोहर पातुरे,विशाल खंडारे, गणेश निलखन, सागर अळस्कार, गणेश अळस्कार, अनिकेत इंगळे,राजेश पातुरे,विजेंद्र भाजिपाले,संदिप अंधारे, विलास हिरळकार,सदानंद कुरडे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,राजेंद्र इंगळे,सचिन शिराळे, निर्भय पोहरे, विकास सदांशिव,राणा डाबेराव, राजेश महल्ले, राजकुमार बोरकर(भंडारज),स्वप्निल सुरवाडे,दिनेश पजई, राजु तायडे,रितेश फुलारी प्रामुख्याने उपस्थित होते.