अकोला,दि. 19- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 164 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, अकोट, तेल्हारा, व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तर बाळापूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे 22 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पातूर येथे 50 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 33 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 57 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज चाचण्या झाल्या नाही, असे दिवसभरात 164 चाचण्यांमध्ये 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 15672 चाचण्या झाल्या त्यात 1043 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.