अकोला,दि.18- हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत मुंग, उडिद व सोयाबीन खरेदी करीता ऑन लाईन नोंदणी दिनांक 15 सप्टे. पासुन जिल्हयातील बाळापुर, पारस व पातुर खरेदी केंद्रावर ऑन लाईन नोंदणी सुरु करण्यात येत आहे. व एफ क्यु. मालाचीच खरेदी होणार आहे. करीता सर्व शेतक-यांनी मुंग, उडिद व सोयाबीन ची ऑन लाईन नोंदणी करुन शासनाच्या हमी भावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. डब्ल्यु हजारे यांनी केले आहे.