तेल्हारा (प्रतिनिधी)- आपल्या चॅनल च्या व स्वतः च्या व्ययक्तिक प्रसिद्धिसाठी रिपब्लिक भारत न्यूज चॅनल चे संपादक अर्णब रंजन गोस्वामी हे आपल्या चॅनल च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार ला बदनाम करण्यासाठी सतत बिनबुडाचे तथ्यहीन आरोप करत आहेत.ज्यामधे प्रामुख्याने मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याविरुद्ध अपमानकारक बदनामीकारक अपशब्द वापरून जनसामन्यामधे राज्य सरकारप्रति द्वेष राग घृणा निर्माण करत आहेत हे केवळ विरोधकांचे राजकीय षडयंत्र आहे. शिवसेना पक्ष व मा.उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांच्या विरुद्ध जर कोणी अपशब्द वापरून अश्या प्रकारचेल बदनामीकारक कारस्थान असेल तर शिवसैनिक कधीही स्वस्थ्य बसणार नाही.याबाबत दि १७ सप्टेंबर रोजी तेल्हारा पोलिस स्टेशन ला शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहड यांनी शिवसैनिकांसमवेत रिपब्लिक भारत न्यूज चॅनल च्या संपादकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,संजय अढाव,अजय गावंडे, विक्रांत शिंदे,पप्पू सोनटक्के, राजेश वानखडे,राम वाकोडे,रामभाऊ फाटकर,निलेश धनभर,सचिन थाटे, ज्ञानेश्वर आखरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.