अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील बार्शीटकळी तालुक्यातील चांगेफळ येथील शेतकरी किशोर शालीग्राम इंगळे वय ४५ वर्ष यांनी खाजगी अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून १२ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले.उपचारादरम्यान दि.१३ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा खिशात स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या चिट्यांच्या आधारे बार्शीटाकळी पोलिसांनी सोमवार दि. १४ रोजी अवैध सावकार दामोदर आप्पाराव चौधरी रा.खडकी खदान अकोला यांच्या विरुद्ध भा द वि ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.मृत शेतकऱ्याच्या पत्नीने बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार व मृताच्या खिशातील चिठ्या नुसार पीडित शेतकरी कुटुंबाकडे वडिलोपार्जित चार एक्कर शेत असून या शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.खडकी येथील अवैध सावकाराकडून बँकेचे धनादेश देऊन त्यांचे पती किशोर इंगळे यांनी 20 हजार रुपये कर्ज घेतले होते 40 हजार रुपये वापस करूनही सावकार पुन्हा 55 हजार रुपये थकीत कर्ज असल्याचे सांगत होता.अवैध सावकार नेहमीच पाटील फोनद्वारे व प्रत्येक्षात भेटून पैशासाठी तगादा लावत होता.त्याच्या जाचाला कंटाळून पती किशोर इंगळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.पीडित शेतकऱ्याला पत्नी,वडील,दोन भाऊ,दोन मुली व एक मुलगा आहे.आज दिनांक १७ गुरुवार रोजी सावकारग्रस्त शेतकरी समितीचे प्रदेशाध्यक्ष रमेश पाटील खिरकर,प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भाबट खादगावकर व अकोला जिल्हाध्यक्ष नरेंद्र शर्मा यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची चांगेफळ येथे जाऊन भेट घेऊन सांत्वन केले.व कुटूंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
कोरोना महामारीमुळे राज्यात कामधंदे बंद पडल्यामुळे राज्यात अवैध सावकारी खुपच बोकळळी आहे. सदरील प्रकरणात अवैध सावकाराच्या विरोधात मृताच्या हस्तलिखित चिठ्या सापडल्या आहेत.व तो सर्व राजकीय व प्रशासकीय व्यक्तीना न्याय देण्याची याचना करतो.म्हणून त्या सावकारावर सावकारी कायद्याच्या कलम 39 व 45 नुसार गुन्हा दाखल होणे गरजेचे होते.सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी मा.जिल्हा उपनिबंधक अकोला यांची भेट घेणार आहोत.
रमेश पाटील खिरकर.
प्रदेशाध्यक्ष
सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्र.