• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

212 अहवाल प्राप्त; 65 पॉझिटीव्ह, 31 डिस्चार्ज, तीन मयत

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 15, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
12
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.15(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 212 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 147 अहवाल निगेटीव्ह तर 65 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज तीन मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि. 14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5796 (4682+959+155) झाली आहे. आज दिवसभरात 31 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 33682 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 32796, फेरतपासणीचे 195 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 691 नमुने होते. आजपर्यंत एकूण 33211 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 28529 तर पॉझिटीव्ह अहवाल 5796 (4682+959+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 65 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 65 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व 40 पुरुष आहे. त्यात दापूरा येथील सहा जण, इमरॉल्ड कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येक तीन जण, गोडेबोले प्लॉट, मोठी उमरी, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित सोपीनाथ नगर,अशोक नगर, शास्त्री नगर, लहान उमरी, लंगडगंज, बोरगाव मंजू, संभाजी नगर, मलकापूर, नानकनगर, दहिगाव गावंडे, नागे लेआऊट, आश्रय नगर, कौलखेड, चांदुर, गाडगे नगर, आदर्श कॉलनी, जूना तापडीया नगर, सिव्हील लाईन, जीएमसी, केशव नगर,सागूर अडगाव, कृषी नगर, संभाजी नगर, कार्ला बु. ता. तेल्हारा, तेल्हारा, चोहट्टा बाजार, खिरपूरी ता. बाळापूर, रुस्तमाबाद ता. बार्शिटाकळी व कटयार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व 14 पुरुष आहे. त्यातील अकोट येथील प्रत्येकी चार जण, जठारपेठ येथील दोन जण, तर उर्वरित मुर्तिजापूर, खदान, डाबकी रोड, रेल्वे स्टेशन जवळ, शंकर नगर, जीएमसी हॉस्टेल, मलकापूर, मुर्तिजापूर रोड, चांदूर व गिता नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

तीन मयत

दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात राजेश्वर कॉलनी येथील 56 वर्षीय महिला असून ती 8 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, वाडेगाव ता. बाळापूर येथील 65 वर्षीय महिला असून ती 12 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर मुर्तिजापूर येथील 62 वर्षीय महिला असून ती 12 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.

31 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच जण, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून 12 जण, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथील चार जण, कोविड केअर सेंटर, अकोट येथून 10 जणांना एकाचा अशा एकूण 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1204 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5796 (4682+959+155) आहे. त्यातील 189 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 4403 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1204 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अहवाल पॉझिटीव्ह
Previous Post

जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची सुरुवात

Next Post

पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत द्या…१८ सप्टेंबर रोजी पत्रकार रस्त्यावर उतरणार,आरोग्य मंत्र्यांना हजारो SMS पाठविणार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
पत्रकार

पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत द्या...१८ सप्टेंबर रोजी पत्रकार रस्त्यावर उतरणार,आरोग्य मंत्र्यांना हजारो SMS पाठविणार

अहवाल पॉझिटीव्ह

जिल्हयात पुन्हा ८४ रुग्ण आढळले तर अक्टिव्ह रुग्ण १२९३ पार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.