• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोविड-19 च्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयाचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला आढावा

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 15, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
जितेंद्र पापळकर
26
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.15(जिमाका)- शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा वाढता ताण लक्षात घेता कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या खाजगी रुग्णालयांतील कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, आमदार अमोल मिटकरी, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.

खाजगी रुग्णालयातील तक्रारीची आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून दखल
खाजगी रुग्णालयात अनेक रुग्णाच्या नातेवाईकाच्या तक्रारी येत असल्याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. काही रुग्णाकडून शासनाने खाजगी रुग्णालयाकरीता निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे तक्रारी येत आहे. याबाबत संबंधित रुग्णालयानी जास्त शुल्क न आकारता सामाजिक बांधीलकी समजून या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णाना व त्यांच्या नातेवाईकांना सहकार्य करावे, तसेच रुग्णालयात अनेक रुग्ण प्रतिक्षायादीवर असल्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण इत्तर जिल्ह्यात उपचारासाठी जात असल्याचे दिसून येत आहे. ही बाब निश्चितच जिल्ह्यासाठी भुषणावह नाही. तरी अशा रुग्णांना योग्य मार्गदर्शन करुन त्याची स्थिती समजून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवावे व बेड उपलब्ध झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी भरती करुन घ्यावे, अशा सूचना आमदार अमोल मिटकरी यांनी दिल्यात.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची प्रतिक्षायादी व दर दर्शनी भागात लावावे
खाजगी रुग्णालयांनी दर्शनी भागी रुग्णाची प्रतिक्षायादी व शासनाने निश्चित केलेल्या उपचार दराची यादी लावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी खाजगी रुग्णालयाच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

जिल्ह्यात ऑक्सीजनची कमतरता नाही

जिल्ह्यात ऑक्सीजनची कुठेही कमतरता पडणार नाही याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, असे सांगून ऑक्सीजनबद्दल काही अडचणी असल्यास नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. परंतु आपल्या रुग्णालयाला लागणारा ऑक्सीजनाचा वापर आगाऊ जिल्हा प्रशासनाकडे नोंदवावा. तसेच पुरेसे ऑक्सीजनचे रिकामी सिलेंडरचा साठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना यावेळी देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुरेसे बेड उपलब्ध

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज रोजी 90 बेड उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटल आयकॉन हॉस्पीटल येथे 24 बेड, ओझोन हॉस्पीटल येथे 28 बेड, बाबन हॉस्पीटल, मुर्तिजापूर येथे आवश्यकतेनुसार बेड, अवधाते हॉस्पीटल येथे 20 बेड, युनिक हॉस्पीटल येथे 18 बेड, अकोला ॲक्सीडेंट हॉस्पीटल येथे 16 बेड उपलब्ध आहेत. या खाजगी रुग्णालयात कोविड-19 चे उपचार करण्यात येतात, अशी माहिती जिल्हयाधिकारी यांनी दिली.

Tags: जितेंद्र पापळकर
Previous Post

विविध समस्यांसाठी तेल्हारा न प दालनात नागरिकांचे ठिय्या आंदोलन

Next Post

जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची सुरुवात

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मोहिम

जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची सुरुवात

अहवाल पॉझिटीव्ह

212 अहवाल प्राप्त; 65 पॉझिटीव्ह, 31 डिस्चार्ज, तीन मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.