कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आलेला आहे आता कुठे कांद्याला भाव मिळायाला लागले होते यात अचानक केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा आदेश काढलेला आहे त्यामुळे निर्यातीसाठी निघालेला कांद्याचे कंटेनर सध्या थांबवण्यात आले आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे या प्रश्नावर आता बच्चू कडू आक्रमक झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू केंद्र सरकारच्या वाणिज्य व कृषी मंत्रालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.