अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 129 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर, बाळापूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तर अकोट येथे 60 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 15 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आयएमए अकोला येथे चाचण्या झाल्या नाही, 43 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 129 चाचण्यांमध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 14913 चाचण्या झाल्या त्यात 967 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.