कोरोना अलर्ट
आज सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१४३
पॉझिटीव्ह-७७
निगेटीव्ह-६६
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ७७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३३ महिला व ४४ पुरुष आहे. त्यात जीएमसी येथील आठ जण, मलकापूर येथून सहा जण, मुर्तिजापूर येथील पाच जण, कौलखेड येथील चार जण, अकोट, आदर्श कॉलनी, जठारपेठ, तापडीया नगर येथील प्रत्येकी तीन जण, रामनगर, खडकी, गौरक्षण रोड, गितानगर, मोठी उमरी, वाडेगाव, खदान येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित दुर्गा चौक, इडस्ट्रीयल कोर्ट, चांदणी ता. पातूर, सुकोडा ता.अकोला, चांदूर, सोनोरी ता.मुर्तिजापूर, जयहिंद चौक, खोलेश्वर, लहान उमरी, वाशिम बायपास, रणपिसे नगर, वानखडे नगर, जूने शहर, विजय नगर, खेतान नगर, सुधीर कॉलनी, शिवाजी कॉलेजजवळ, केला प्लॉट, उदयवाडी खरप रोड, आगर, कच्ची खोली, रामदास पेठ, जोगळेकर प्लॉट, पिंजर, कृषी नगर, सिव्हील लाईन, दहिहांडा व दोंडगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात डाबकी रोड, अकोला येथील ६० वर्षीय महिला असून ती ९ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला,तर शिरसो, मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय पुरुष असून तो १० सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४५९१+९५१+१५५=५६९७
मयत-१८३
डिस्चार्ज- ४२२६
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१२८८
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!