अकोला – कोविड रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हयात कोविड रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलेले आहेत .परंतु काही रुग्ण घराबाहेर निघून गावात फिरताना दिसत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा रुग्णावर फौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधितांशी दिले आहेत. तसेच रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर तात्काळ दवाखान्यात भरती व्हावे, नियमितपणे ऑक्सिजन लेव्हल तपासणी करण्यात यावी. श्वसनाचा त्रास असल्यास घरी राहु नये, स्थानिक अधिकारी व पथकाकडून नियमित पणे संवाद करावा वारंवार विचार पूस करावी, शेजारी लोकांनी त्यांच्या वर लक्ष ठेवावे बाहेर फिरत असल्यास तात्काळ प्रशासनाला सांगावे.
कोरोना होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांनी आपल्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये, याबाबत दक्षता घ्यावा. आपल्यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही अशी कोणतीही कृती करू नये, असे आढळल्यास त्यांच्या वर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 376 जणांना होम क्वॉरटाइन करण्यात आले आहे. यात अकोला ग्रामीण येथे 19 जण,अकोट येथे नऊ जण, बाळापूर येथे 48 जण, बार्शीटाकळी येथे 16 जण, पातूर येथे 97 जण, मुर्तिजापूर येथे 101 जण, तेल्हारा येथे सात जण तसेच अकोला मनपा येथे 79 जणांचा समावेश आहे.
नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की होम आयसोलेशन मध्ये असलेला रुग्ण त्याचा होम आयसोलेशनच्या कालावधी पूर्ण होण्यापूर्वी घराबाहेर फिरताना आढल्यास प्रशासणाला कळवावे. होम आयसोलेशन 17 दिवसाचा कालावधी आहे.