भांबेरी(योगेश नायकवाडे)- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून महिनाभर पूर्वी केलेल्या दापुरा, मनब्दा भांबेरी रस्त्याच्या काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. महिनाभरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून रस्त्याची वाट लागल्याने वंचीत च्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या पुन्हा काम करून देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते.याबाबत अवर अकोला न्यूज ने “रस्ता केला सस्ता” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती.बातमीची तसेच उपोषणाची दखल घेत आज भांबेरी येथील उपोषणाला वंचित चे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे ह्यांनी भेट दिली.ह्या वेळी शाखा अभियंता ठाकरे, उपविभागीय अभियंता आपोतिकर, नायब तहसीलदार सुरडकर, तेल्हारा पोलीस स्टेशन चे पीएसआय देशमुख यांचे सोबत प्रामुख्याने उपस्थित होते.वंचीत च्या पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत रस्ता नव्याने करण्याची मागणी केली. ह्याप्रसंगी उपविभागीय अभियंता आपोतिकर ह्यांनी रस्ता दुरुस्ती व पाच वर्षे मेंटेनन्स ची जबाबदारी असल्याने कंत्राटदार ह्यांचे कडून काम करून घेण्याची तसेच तो पर्यंत देयक अदा न करण्याची लेखी हमी दिली.लेखी हमी नंतर उपोषणकर्ते प्रवीण भोजने, सुनील बोडदे, अतुल खंडेराव व सुधाकर बोडदे ह्यांनी उपोषण मागे घेतले.अधिकारी पदाधिकारी ह्यांचे हस्ते उपोषण सोडविण्यात आले.ह्यावेळी अशोक दारोकर, जीवन बोडदे, शफीक पठाण, श्रीकांत काळे, गोकुळ कौस्कर, पंजाबराव तायडे, एड मंगेश बोडदे, सुधाकर भोजने, आशिष धांडे, शैलेश भोजने, अविनाश निखाडे, प्रशांत तायडे,संतोष बोडदे प्रामुख्याने उपस्थित होते।