तेल्हारा(प्रतिनिधी)- जिल्हयातील भांबेरी रस्ता गेल्या काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करून पूर्ण करण्यात आला मात्र पहिल्याच पावसात रस्ता सस्ता केल्याने हा मार्ग उखडला त्यामुळे नागरिकांनी उपोषणाला बसून संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यावर कारवाई करून रस्ता पुन्हा बनवून देण्याची मागनी केली.
अकोला जिल्ह्यातील भांबेरी ते दापुरा फाटा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अत्यंत संथ गतीने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम झाले असल्यामुळे माध्यमांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याचे लक्षात आणून देखील संबंधित अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने याकडे लक्ष दिले नाही रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक महिना च झाला तर रस्ता उखरला व जागोजागी खड्डे पडले रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असल्याने प्रवीण भोजने, सुनिल बोदडे, अतुल खंडेराव, अतिश भोजने, सुनील बा. बोदडे हे आज दिनांक ११ रोजी आमरण उपोषणाला भांबेरी येथे बसले भांबेरी ते दापुरा फाटा हा संपूर्ण रस्ता पुन्हा करून देण्यात यावा व सदर रस्त्याची चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचारी व कंत्राटदार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषनकर्ते करित आहेत