अकोला(प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदे चे नेते एस एम देशमुख यांनी केलेल्या आवाहनानुसार आज , कोरोना मुळे मृतक पत्रकार मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस स्व.संतोष पवार , स्व.पांडुरंग रायकर , यांच्या सह दिवंगत १५ पत्रकारांना अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन मध्ये आयोजित श्रद्धांजली सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली , परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत सिद्धार्थ शर्मा यांनी बोलताना स्व.संतोष पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला , कोरोना मुळे मृत झालेल्या राज्यातील दिवंगत पत्रकारांच्या परिवाराला शासनाने ५० लाख रु ची मदत तात्काळ द्यावी अशी मागणी सिद्धार्थ शर्मा यांनी केली , जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांनी प्रास्ताविक मध्ये दिवंगत पत्रकारांची माहिती दिली, उमेश अलोने यांनी यावेळी कोरोना संक्रमण काळात काम करीत असताना पत्रकारांनी सावधानता बाळगावी असे सांगितले , परिषदेने कोरोना मुळे मरण पावलेल्या पत्रकारांसाठी तातडीने मदत करण्याची मागणी केल्या बद्दल मिरसाहेब यांनी परिषद च नेहमी पत्रकारांसाठी अग्रेसर असल्याचे सांगितले , पत्रकार संघाचे चिटणीस संजय खांडेकर , दीपक देशपांडे , कमल किशोर शर्मा , जयेश जगड , मुकुंद देशमुख , समाधान खरात , नंदू सोपले , अजय चव्हाण , मो निसार शेख , राऊत , यांचे सह पत्रकार बंधू या प्रसंगी उपस्थित होते ,