अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज दिवसभरात झालेल्या 141 चाचण्या झाल्या त्यात 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे 32 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 35 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे आठ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 57 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे दिवसभरात 141 चाचण्यांमध्ये 17 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 14547 चाचण्या झाल्या त्यात 941 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.