कोरोना अलर्ट
आज सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२१६
पॉझिटीव्ह- ६२
निगेटीव्ह-१५४
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ६२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २४ महिला व ३८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ३२ जण मुर्तिजापूर येथील, बेलुरा ता. पातुर येथील सात जण, पालसो बधे येथील चार जण, चिखली ता मुर्तिजापूर व लहान उमरी येथील तीन जण, अकोट व आळसी प्लॉट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जैन मंदिर, गणेश नगर,महसूल कॉलनी, तांडी, मलकापूर, खदान, खेतान नगर, बेलखेड ता. मुर्तिजापूर व कंचनपुरा पुरद येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मोठी उमरी, विठ्ठल नगर, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष असून तो दि. २ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३७७२+७९३+११०=४६७५
मयत-१६६
डिस्चार्ज- ३५०५
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१००४
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!