अकोला(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील अकोला-दर्यापूर राज्य महामार्गावर असणाऱ्या म्हैसांग गावाला लागून असणाऱ्या येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देशमुख व निखिल देशमुख यांच्या मालकीचे असणारे हॉटेल स्वप्नील या हॉटेलच्या माध्यमातून त्यानी परिवहन महामंडळाच्या एसटी चालक व वाहक कर्मचारी वर्गापासून आपल्या हॉटेल मध्ये जेवण व राहण्यासाठी वर्षभर निःशुल्क व्यवस्था केली आहे.यामुळे बाहेर गावातून येणाऱ्या एसटी कर्मचारी वर्गाला यामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच आजच्या कोरोना संकटात तर एसटी सेवा घटयात सुरू असल्याने या कर्मचारी वर्गाच्या पगारावर त्याचा परिणाम झाला आहे.याच संकटात आपला घर संसार कसा चालवा हा प्रश्न या कर्मचारी वर्गांना असतो.यासाठीच सामाजिक भान जपत म्हैसांग येथील हॉटेल स्वप्नील याचे संचालक मिलिंद देशमुख व निखिल देशमुख यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाचे एसटी विभागाच्या वतीने सर्वत्र कौतुक होत आहे.