अकोट(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील ग्राम बळेगाव येथिल येथिल एकाच कुटुंबातील तिन व्यक्तींनि शासनाच्या घरकुल योजने चा लाभ घेतलेला असुन अनुक्रमे घनश्याम बाळकृष्ण कोल्हतकार यांनी सन 2013- 2014 यावर्षी राजीव गांधी निवारा योजने तून लाभ घेतलेला आहे.तर बाळकृष्ण पांडूरंग कोल्हतकार यांनी सन 2016-2017 प्रधानमंत्री आवास योजना नवीन घरकुल बांधकामासाठी लाभार्थी म्हणून निवड झाली होती.तर देवानंद बाळकृष्ण कोल्हतकार यांची सन 2019- 2020 प्रधानमंत्री आवास योजना नवीन घरकुल बांधकामासाठी नवीन लाभार्थी म्हणून निवड झाली होती. त्यापैकी घनश्याम बाळकृष्ण कोल्हतकार यांनी सन 2014 मधेच अनुदान घेतले व बाळकृष्ण पांडूरंग कोल्हतकार यांनी प्रधानमंत्री आवास योजना या योजने अंतर्गत कोणत्याही प्रकारचे घराचे बांधकाम न करता शासनाचे 1,20,000 अनुदान लाटल्याचे निर्दशनास येत आहे व देवानंद बाळकृष्ण कोल्हतकार यांचे सुध्दा प्रधानमंत्री आवास योजना सन 2019- 2020 नुसार घरकुलाचे बांधकाम सुरु असुन ते सद्यास्थितीत स्व:ताचे जागेवर बांधकाम करित नसुन गुणाबाई चिकटे यांचे जागेवर बांधकाम करित असल्याचे नीर्दशनास येत आहे.बाळकृष्ण पांडूरंग कोल्हतकार यांनी त्यांचे दोन मुलांच्या बांधलेल्या घरकुलाचा फायदा घेत स्व:ताचे घरकुल सुध्दा मुलाचे घरकुल दाखवुन स्व:ताच्या नावाने अनुदान लाटले आहे.अशा सन 2016-2017 मधे नवीन घरकुल बांधकामासाठी निवड झाल्या नंतर बाळकृष्ण पांडूरंग कोल्हतकार यांनी कोणत्याही प्रकारचा पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल न बांधता खोट्या प्रकारचे दस्तएवज दाखल करुन फक्त शासनाचे अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केली आहे.त्याला जबाबदार असलेले ग्रा.पं.बळेगावचे सचिव व ग्रामीण गृह निर्माण अभियंता,गटविकास अधिकारी पं.स.अकोट हे सुध्दा जबाबदार आहेत.त्यामूळे त्यांच्यावर शासनाची फसवणूक,व अफरातफर संधर्भात गुन्हे दाखल करण्यात यावे.या अगोदर वेळोवेळी गटविकास अधिकारी अकोट यांचेकडे तक्रारी दिल्या आहेत.त्यावर आजपरंत सुध्दा कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.अशा आसयाची लेखी तक्रार अर्जदार सचिन विद्याद्यर वडतकार बळेगाव यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जी.प.अकोला यांचेकडे केली आहे.