अकोला (प्रतिनिधी)- स्थानिक जुने शहर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गंगानागर परिसरातील रहिवासी असलेल्या तन्वीर अहमद उर्फ सोनू जहांगीर या युवकास विजय पान सेंटर वर विदेशी बनावटीच्या देशी कट्टयासह स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी सकाळी अटक केली .
याबाबत सविस्तर असे की , गंगानागर येथे असलेल्या विजय पान सेंटर वर एक युवक अग्निशस्त्र सोबत बाळगून उभा असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली , सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी पथकाला आदेश देत सापळा रचला आणि सदर संशयित युवकाला ताब्यात घेत विचारपूस करीत अंगझडती घेतली असता त्यांना विदेशी बनावटीचा देशी कट्टा मिळाला . सदर आरोपीविरुद्ध जुन्हे शहर पोलीस ठाण्यात 3/25 आर्म ऍक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे .
सदर कारवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार , सपोनि अशोक चाटी, रफिक शेख , एजाज अहमद , अब्दुल माजिद , रवी इरचे , संदीप तायडे , यांनी केली.