तेल्हारा (प्रतिनिधी)-
तेल्हारा तालुक्यातील
सर्वच रस्ते आता जीवघेणे ठरत
असून, संबंधित ठेकेदाराला कुणीतरी
पाठीशी घालत असल्याची चर्चा होत
आहे, स्वयंघोषित विकास महर्षी यांनी
लॉकडाऊन लागल्या पासून तेल्हारा
तालुक्याला भेट दिली नसून
जनप्रतिनिधी यांनी झोपेचे सोंग घेतले
आहे का? असा प्रश्न आता सर्वसामान्य
नागरिक विचारत आहे, यातच तेल्हारा
तालुक्यातील शिवाय ग्रुप
समाजकार्यात पुढे सरसावला असून
संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची
लेखी तक्रार पोलीस स्टेशन तेल्हारा
उपविभागीय पोलिस अधिकारी
अकोट जिल्हा अध्यक्ष अकोला
पालकमंत्री अकोला गृहराज्यमंत्री
महाराष्ट्र राज्य यांना दिली आहे.
तक्रारीत शिवाय ग्रुपचे
अध्यक्ष जयंतयराव गावंडे यांनी, बेलखेड
येथील अपघातात मृत्यू पावलेल्या
गजानन जाधव व याच रोड वर जखमी
झालेले शंकरराव विखे यांना डोक्याला
मार लागून १८ टाके पडल्याचा उल्लेख
करीत, बर्याच गोरगरीब
कुटुंबातील नागरिकांचे आयुष्य
कुणाचा हात तर कुणाचा पाय असे
कायमचे अपंगत्व तेल्हारा बेलखेड
आणि तेल्हारा ते आडसुळ व तेल्हारा ते वरवट यांसह
तालुक्यातील सर्वच रस्त्याने आले
असून, या रस्त्याचे दोन वर्षापासून
काम सुरू आहे ठेकेदार याने पूर्ण रस्ताच
खोदला त्यावर पिवळी माती टाकली या
मातीमुळे उन्हाळ्यात वाहनधारकांना
धुळीचा सामना व पावसाळ्यात
मातीमुळे चिखल झाल्याने गाड्या
अडकून पडत कितीतरी अपघात होत
आहे, अपघातात अपंगत्व आलेल्या
अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ
फक्त या रस्त्यामुळे व ठेकेदाराच्या
निष्काळजीपणामुळे येत असून कामात
विनाकारण दिरंगाई करत
गैरव्यवहाराचा व मनुष्यवधाचा गुन्हा
दाखल करावा यासाठी शिवाय ग्रुप
तेल्हारा यांच्यावतीने निवेदन देण्यात
आले, निवेदनावर शिवाय ग्रुपचे
अध्यक्ष जयंता गावंडे, राजेश वानखडे,
मंगेशसिंह मलीये, संजय जयस्वाल ,हेमंत
पाटील आवचार, कैलास जिंदे ,मनोज
राठी ,अमोल ढोले, सुनील पालीवाल,
श्याम जींदे ,विजय देशमुख ,राजेश टोहरे,
माधव जामोदे ,जगदीश भुजबळे ,यांच्या
स्वाक्षऱ्या आहेत,