अकोला : वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या मृतक देवानंद प्रभू नरवाडे या (३०) वर्षीय मजूराचा मृतदेह शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान नदी पात्रातील डोंगरगाव शिवारात आढळला. पोलिस पंचनाम्यानंतर त्याची ओळख पटली असून पुढील कारवाई सुरू आहे. वाळू चा अवैध उपसा करण्याच्या माफीयांमुळे एका मजूराचा बळी गेला आहे.
अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील मन नदीत वाळूचा उपसा सुरू असताना अचानक पाण्याचा लोंढा आल्याने तो वाहून गेला.ही घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घडली होती. मन नदीच्या पात्रात सातत्याने वाळूचा अवैध उपसा सुरू असून वाळू माफीयांवर कारवाई करावी अशी मागणी मनारखेडच्या उपसरपंच यांनी केली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,बाळापूर तहसील आणि बाळापूर उपविभागाचे महसूल अधिकाºयांना याबाबत वारंवार अवगत करण्यात आले. मात्र प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने मजूराचा हकनाक बळी गेला आहे.