तेल्हारा (शुभम सोनटक्के)-
पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार उद्भवतात.या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम. के. दांदडे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. पी. टी.शेंडे तसेच स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील कृषी दूतांनी वाकोडी येथे जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण केले.
यावेळी सरपंच सौ. सोनाली येवले, उपसरपंच विनेश गव्हांदे,कृषिदूत पूजा फाटे व गावकरी मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कृषिदूतांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे सर, समुपदेशक व्ही.टी.कपले मॅडम व विषय तज्ज्ञ महेश आखूड सर यांचे मार्गदर्शन लाभले.