तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे तसेच प्रशासनाकडून अनेक नियम व अटी जाहीर करण्यात आलेल्या असल्याने गणपती विसर्जन हे घरची करण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यामुळे शहरातील जय भवानी मंडळाने गणेश भक्तांची आस्था जपुन स्थानिक संत रविदास समाज मंदिर येथे कृत्रिम गणेश घाट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी गणेश विसर्जन या ठिकाणी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत विधिवत रित्या पार पाडण्यासाठी उपाययोजना केल्या आहे असे जय भवानी मंडळा कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी गणेश विसर्जन कृत्रिम घाटातच करावे जेणेकरून निसर्गाचा ऱ्हास रोखल्या जाईल.