तेल्हारा(प्रतिनिधी)-कोरोना महामारीच्या या काळात आधीच नागरिक हैराण झाले असतांना हिवरखेड मधील एका विकृत मानसिकता असलेल्या लिंग पिसाट इसमाने अपंग मतिमंद युवतीवर बलात्कार केल्याने हिवरखेड हादरले असून याबाबत तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरखेड येथे आज दि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान हृदय पिळवणारी घटना घडली असून तीस वर्षीय मतिमंद अपंग युवतीचे आई वडील व भाऊ असे सकाळी कामानिमित्त बाहेर गेले असता अपंग व मतिमंद युवती ही एकटीच घरी आपल्या अंगणात खाटेवर झोपली असतांना हिवरखेड येथील मिलिंद नगर येथे राहणाऱ्या संतोष सीताराम इंगळे या नराधमाने अत्याचार केला सदर घटनेची वाचता कोणाकडे फोडल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली परंतु सदर घडलेली घटना युवतीने आपल्या आई-वडिलांना सांगितली असता त्यांनी सर्वप्रथम हिवरखेड पोलीस स्टेशन गाठले परंतु कोरोना विषाणूचा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत झालेला प्रसार लक्षात घेता सदर पोलीस स्टेशन चा कार्यभाग तेल्हारा पोलीस स्टेशन कडे वर्ग केला असल्याने पीडित युवतीच्या आईवडिलांनी युवतीसह तेल्हारा पोलीस स्टेशन गाठले घडलेल्या घटनेची तक्रार पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन केला येथे दिली असता कलम ३७६(२)(१),५०६,४५२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या विकृत अशा घटनेने हिवरखेड हादरले आहे.