तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोनाच्या महामारीमुळे यंदाचा गणपती उत्सव हा साद्या पध्दतीने राबवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते त्याला गणपती मंडळांनी उत्तम असा प्रतिसाद दिला.लोकडाऊनचा काळ असल्याने गणपती विसर्जन कुठे करावे असा प्रश्न भक्तांना पडला आहे.जिल्ह्यातील अनेक शहरात गणपती विसर्जन करण्यासाठी कृत्रीम गणेश घाट तयार करण्यात आले आहेत मात्र तेल्हारा न प प्रशासनाकडून अद्याप कुठेही गणेश घाट तयार करण्यात आला नाही त्यामुळे गणपती विसर्जन कुठे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे न प प्रशासनाने गणेश भक्तांची इच्छा पूर्ण करून गणेश घाट तयार करण्यात यावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.