तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील तळेगाव बाजार येथे गेल्या पंधरा दिवसांपासून गावात अज्ञात तापाची साथ घरोघरी असुन या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग चे दुर्लक्ष असलेल्याने गावात तापीचे रुग्ण वाढले आहेत
हिवरखेड आरोग्य केंद्राला अतंर्गत येत असलेल्या तळेगाव बाजार येथे गेल्या पंधरा दिवसांपासून गावात अज्ञाण तापीने थैमान घातले असल्यामुळे गावातील नागरिक हैराण झाले असले तरी आरोग्य विभाग मुळे गावात तापीची साथ वाढल्याचे नागरिक बोलत आहेत तळेगाव बाजार येथे आरोग्य उपकेंद्र मध्ये आर एन तुपोने आरोग्य सेविका असुन रूग्ण आरोग्य केंद्रात गेल्यास रूग्णांस आपण बाहेर थांबा व कोणत्याही वेळी दवाखान्यात येवू नये असे म्हणुन पेशंट ला लावून देतात या आधी या आरोग्य सेविकेचि तक्रार गावातील नागरिकांनी केली होती मात्र या बाबिकडे आरोग्य विभाग चे दुर्लक्ष होत आहे गावात मात्र नागरिक तापीने हैराण झाले आहेत रूग्ण ला ताप येवुन थंडी वाजणे, हात पाय दुखणे अशि साथ गावात प्रत्येक कुटुंबात असलेल्याने गावकरी हैराण झाले आहेत.