मुर्तिजापूर (सुमित सोनोने)-भारतीय राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे.मात्र प्रवीण तरडे यांनी भारतीय संविधानावर गणपतीची स्थापना केली, राज्यघटनेप्रमाणे आपला देश धर्मनिरपेक्ष आहे,धार्मिक कार्यक्रमात राज्यघटना वापरता येत नाही.
असे असताना संविधान पाट समजून श्री तरडे यांनी भारतीय संविधानाचा वापर केला त्यामुळे समस्त जनतेच्या भावना दुखावल्या असून देशात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रवीण तरडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड ने केली आहे.यावेळी संभाजी ब्रिगेड चे मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष तेजस टापरे, ता. उपाध्यक्ष प्रतीक नागरिकर, ता. सचिव पवन तळोकार, ता. कार्याध्यक्ष उज्वल ठाकरे, शहर अध्यक्ष निलेश सुखसोहळे, ता. प्रवक्ता धम्मरत्न वाहणे, ता.संघटक सागर नवले, शहर उपाध्यक्ष तुषार बांबल, चेतन देशमुख ता. कोषाध्यक्ष, अनोख गुंजाळ शहर कोषाध्यक्ष , ज्ञानेश्वर हिंगणकर सोबत अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.