अकोट(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना जनजागृती व्हावी यासाठी कृषि विभाग आणि रासी सीड्स यांच्या संयुक्तविद्यमाने संपूर्ण अकोट तालुक्यात कामगंध सापळे वाटप चालू आहे. या वेळी अकोट तालुक्यातील बेलुरा गावातील शेतकरी वर्ग सोबतच कृषि विभागाचे अधिकारी श्री इंगोले(कृषि सहायक) आणि रासी सीड्सचे जिल्हा प्रतिनिधी श्री. अनिल तायडे व तालुका प्रतिनिधी श्री.अक्षय गायकवाड हे गुलाबी बोंडअळी वर नियंत्रण, कामगंध सापळे, आणि फवारणी या बद्दल शेतकर्यांना मार्गदर्शन करत आहे.यावेळी युवराज मंगळे,नामदेव कोळसकर,सतिष साबळे,गजानन काळे,श्रीकृष्ण ढोले,पुरुषोत्तम साबळे,प्रवीण मंगळे,वृषभ मंगळे,अर्जून ढोले,देवकुमार मंगळे,गोपाल मंगळे,विठ्ठलदास मेहेकर,गजानन कोकाटे,सेवकराम मंगळे,प्रभूदास साबळे,आदीत्य कोकाटे,प्रवीण ढोले,दिलीप साबळे,रघुनाथ साबळे,गणेश मंगळे,रामेश्वर काळे,रामवीजय साबळे,सरपंच रामभाऊ मंगळे आदींची उपस्थिती होती