• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाडीबीटी पोर्टलवरील मंजूर शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी आधार क्रमांक व बॅंक खाते संलग्नता आवश्यक

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 29, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
महाडीबीटी
13
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – महाडीबीटी प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा होण्यासाठी बॅंक खाते व आधार क्रमांक संलग्नता आवश्यक आहे. यासंदर्भात जी प्रकरणे प्रलंबित आहेत त्याप्रकरणी विद्यार्थ्यांचे आधार क्र्मांक व बँक खाते त्यांच्यास्तरावरून जसे जसे अद्यावत केले जाईल, त्याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा होणार असल्याचे महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक कक्ष व राज्य शासनाचे माहिती व तंत्रज्ञान संचालनालय यांनी शासनास कळविले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,अकोला यांनी दिली आहे.

महाडीबीटी पोर्टलवरून सन २०१९-२० मध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या मंजूर झालेल्या अर्जानुसार विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयाचे पहिला/दुसरा हप्ता किंवा दोन्ही हप्त्याचे अर्ज मंजूर होऊन देखील देय होणारी शिष्यवृत्ती रक्कम अद्यापही संबंधित लाभार्थी /महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा होत नसल्याचे विविध,पालक तसेच विविध संघटनांनी आयुक्तालयाचे व शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. त्याअनुषंगाने वरील बा्बीवर आयुक्तालयाकडून निराकरण प्राप्त झाले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

त्यानुसार, अशा अर्जावर संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी प्रणालीद्वारे ऑनलाईन मान्यता प्रदान केल्यावर आयुक्तालय स्तरावरुन त्याचे देयके तयार करून कोषागाराकडून देय असलेली रक्कम पारित करून महाडिबीटी पोर्टलच्या pool बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. सदर देय असलेली रक्कम ही PFMS या केंद्रभूत वितरण प्रणालीमधून विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये थेट महाडीबीटी प्रणालीदवारे जमा होणे अपेक्षित आहे. तदपूर्वी PEMSप्रणालीतून वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास संलग्न असल्याचे NPCI या केंद्रभूत पडताळणी प्रणालीतून मान्य झालेल्या पात्र लाभार्थ्यांचे आधार व बँक खात्याची पडताळणी करण्यात येते. तथापि या पडताळणी प्रक्रियेस PFMS व NPCI यांच्याच स्तरावर विलंब होत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत आयुक्तालय स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान संचालनालयास तसेच राज्य स्तरावरील PFMS व NPCI कार्यालयांना वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.

याशिवाय, देयके जनरेट झालेल्या अर्जापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे वितरण सद्यस्थितीत महाडिबीटी प्रणालीवरील (Pool account) व PFMS या प्रणलीदवारे चालू असून सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम आधार संलग्न बॅंक खात्यात अद्याप जमा व्हायची आहे. ही रक्कम PFMS प्रणालीदवारे वितरित होण्यास खालील कारणांमुळे विलंब होत आहे.

१. नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जामध्ये आधार क्रमांक अद्यावत नसणे.

२. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे.

३.विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनोंक्टिव्ह असणे.

४. विद्यार्थ्यांनी व्हाऊचर रिडीम न करणे.

५. विद्यार्थ्यांचे आधार संलग्न असलेले बँकेतील खाते बंद असणे.

६. विद्यार्थ्यांचे आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे.

७. दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यावत करण्याकरिता अर्ज प्रलंबित असणे.

या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी निगडित असून त्या त्यांच्यास्तरावरून जसे जसे अद्यावत

केले जाईल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा होणार असल्याने

महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक कक्ष व राज्य शासनाचे माहिती व तंत्रज्ञान संचालनालय यांनी शासनास कळविले आहे. वरील कारणामुळे शिष्यवृत्ती/फ्रीशीपच्या रकमेचे वितरणामध्ये विलंब होत असल्याची बाब सर्व विद्यार्थी, पालक,महाविद्यालये,विद्यार्थी संघटना,संबंधित सेवाभावी संस्था यांचे निदर्शनास सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अकोला यांनी आणून दिले आहे. जेणेकरून त्यांचेमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचे निराकरण होऊ शकेल, असेही कळविण्यात आले आहे.

Tags: आधारबॅंकमहाडीबीटी
Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १९८ चाचण्या, १० पॉझिटिव्ह

Next Post

खते खरेदीसाठी वापरा डिजीटल पेमेंट पद्धती -जिल्हा कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
डिजीटल पेमेंट

खते खरेदीसाठी वापरा डिजीटल पेमेंट पद्धती -जिल्हा कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन

कृषि

कृषि मंत्री ना. दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.