अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २५० अहवाल प्राप्त झाले. त्यातील २०३ अहवाल निगेटीव्ह तर ४७ अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि.२७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ३१ तर खाजगी लॅब मध्ये २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३७६५ (३०६२+६७८+२५) झाली आहे. आज दिवसभरात २८ रुग्ण बरे झाले, तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २६८९२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २६१९७, फेरतपासणीचे १७६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५१९ नमुने होते. आजपर्यंत एकूण २६७३३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २३६७१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३७६५ (३०६२+६७८+२५) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज ४७ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ४७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात आठ महिला व २४ पुरुष आहेत. त्यात डाबकी रोड येथील चार, तेल्हारा येथील तीन, जुने शहर येथील दोन, कीर्ती नगर येथील दोन, अकोट येथील दोन, बाजोरिया हाऊस येथील दोन, तर संजापूर ता.मूर्तिजापूर, माळेगाव बाजार ता.तेल्हारा, गावंडगाव ता.पातूर, सिंधी कॅम्प, आकाशवाणीच्या मागे, मलकापूर, मराठा नगर, पिंपळखुटा ता.पातूर, महादेव नगर, म्हैसांग, रामदास पेठ, हिंगणा फाटा, हरिहर पेठ, पंचशील नगर, आगर, हिवरखेड ता.तेल्हारा, अकोट फ़ैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तर आज सायंकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात पुरुष व आठ महिला यांचा समावेश आहे. ते सर्व जण मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये ३१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यात २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या चाचण्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, अकोला यांच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
एक मयत
दरम्यान आज दुपारनंतर एका ७३ वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ही महिला आलेगाव ता. पातूर येथील रहिवासी असून दि.२२ रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. तिचा आज मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली.
२८ जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २३, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, तर हॉटेल रिजेन्सी येथून तीन अशा एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
४९९ रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ३७६५ (३०६२+६७८+२५) आहे. त्यातील १४८ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ३११८ संख्या आहे. तर सद्यस्थितीत ४९९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.