• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

एकात्मिक आदिवासी प्रकल्प अकोला कार्यालयाचा उपक्रम: ‘शाळा आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे खेडोपाडी ज्ञानदान

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
शाळा
26
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीत ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गरीब तसेच दुर्गम भागात मोबाईल वा नेटवर्क सुविधा उपलब्ध नसणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

यासंदर्भात प्रकल्प अधिकारी अकोला राजेंद्रकुमार हिवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला, वाशिम व बुलडाणा या तिन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला अंतर्गत असून शासकिय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन अभ्यासासाठी पुरेसे साधन नसल्याने अनलॉक लर्निंग उपक्रमातंर्गत ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला प्रकल्पात शासकीय आश्रमशाळा कोथळी, पणज, तरोडा, घाटबोरी, सायखेड, शेलूबाजार किन्हीराजा, मुसळवाडी या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा आहेत. या शाळामधून २३४३ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याचबरोबर १९ अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुद्धा सुमारे ६८३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आश्रमशाळा बंद असून विद्यार्थी गावातच आहेत. अशा परिस्थितीत अकोला प्रकल्पामधील शासकीय व अनुदानित आश्रमशाळामधून ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. त्यासाठी अनलॉक लर्निंग अंतर्गत ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी या शाळा मधील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, तथा सहायक प्रकल्प अधिकारी यांचे पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून या शाळांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गावांमध्ये शिक्षकांनी जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली आहेत. त्यानंतर शिक्षक व गावातील स्थानिक संसाधन व्यक्तीच्या माध्यमातून सामाजिक अंतर राखुन शिक्षण देणे सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे, स्वाध्याय, गृहपाठ देणे, गृहपाठ तपासणे सोबतच इतर उपक्रम देणे. या उपक्रमामुळे शासकीय आश्रमशाळेबरोबरच अनुदानित आश्रमशाळामध्ये सुद्धा हा उपक्रम दुर्गमभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकाश देणारा ठरत आहे.

Tags: ज्ञानदानशाळाशाळा आपल्या दारी
Previous Post

सार्वजनिक वितरण व्यवस्था; माहे सप्टेंबरचे धान्य वाटप परिमाण

Next Post

युवासेनेच्या वतीने अकोट ग्रामिण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रुग्णालय

युवासेनेच्या वतीने अकोट ग्रामिण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप...

कोरोना

मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि आमदारांना कोरोना चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.