अकोला – आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३६४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३३२ अहवाल निगेटीव्ह तर ३२ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३६६२(३०१५+६४७) झाली आहे. आज दिवसभरात २० रुग्ण बरे झाले, तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २६६२७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५९४१, फेरतपासणीचे १७४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५१२ नमुने होते. आजपर्यंत एकूण २६४८३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २३४६८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३६६२(३०१५+६४७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज ३२ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात सात महिला व २५ पुरुष आहेत. त्यात सहा जण सिरसोली ता. अकोट येथील तर दोन जण अकोट येथील, पाच जण वरुर ता. तेल्हारा येथील, तीन जण तेल्हारा येथील, चार जण सुटाळा येथील रहिवासी असून दोन जण जीएमसी येथील तर अन्य माऊंट कार्मेल शाळेजवळ, पंचशील नगर, संताजीनगर, शास्त्रीनगर, काटखेड ता. बार्शीटाकळी, सस्ती ता. पातुर, मलकापूर, मुर्तिजापूर, डाबकीरोड, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे.
एक मयत
दरम्यान दरम्यान आज दुपारनंतर एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ५८ वर्षीय पुरुष रुग्ण असून हा रुग्ण खेडकर नगर अकोला येथील रहिवासी आहे. हा रुग्ण आज पहाटे दाखल झाला होता त्याचा दुपारनंतर मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
२० जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून सात, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून पाच असे एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
४२५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ३६६२(३०१५+६४७) आहे. त्यातील १४७ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ३०९० संख्या आहे. तर सद्यस्थितीत ४२५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.