• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोविड १९ संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाची सिरॉलॉजिकल सर्वेक्षण ची तयारी

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
सिरॉलॉजिकल सर्वेक्षण
15
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यात कोविड १९ या विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी सिरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्याची तयारी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. यासंदर्भात आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे यासंदर्भात आढावा घेऊन सर्वेक्षणाचे नियोजन करण्याविषयी चर्चा केली.

यासंदर्भात आज सकाळी झालेल्या ऑनलाईन बैठकीस विभागीय आयुक्त पियुष सिंह हे अमरावती येथून तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. उमेश जवळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी सहभागी झाले होते. यावेळी या सर्वेक्षणाचे राज्य नोडल अधिकारी डॉ. संजय झोडपे यांनी नागपूर येथून सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांपर्यंत कोविड चा संसर्ग पोहोचला?, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरिरात प्रतिकार शक्ती तयार झाली? त्यातून समुहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही? यासंदर्भात या सर्वेक्षणातून माहिती मिळेल. असे सर्वेक्षण भारतीय वैद्यकीय अनुसंधानतर्फे देशात सध्या ८० जिल्ह्यात सुरु आहे. मात्र अकोला जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्ह्यातही हे सर्वेक्षण राबविण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी एक लाखामागे १०० व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण केले जाईल. या रक्त नमुन्यांच्या चाचण्या करण्यासाठी ज्यांना आतापर्यंत कोरोना झालेला नाही अशा लोकांच्या रक्ताचे नमुने वेगवेगळ्या समुहातून घेण्यात येतील. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील, शहरी –ग्रामिण, अति अजोखमीचे व्यक्ती, विविध वयोगटातील व्यक्ती या प्रमाणे विविध गटांमधील व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने आरोग्य यंत्रणेमार्फत संकलित करुन चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांमधून त्या त्या व्यक्तिच्या शरिरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.

सध्या प्रशासन यासंदर्भात चाचण्या कशापद्धतीने राबवायच्या याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समुह औषध निर्माण व सुक्ष्मजीवशास्त्र या विभागांमार्फत नियोजन करावे, त्यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणांचा सहयोग घ्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

Tags: कोविडसर्वेक्षणसिरॉलॉजिकल सर्वेक्षण
Previous Post

एमआयएम, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ह्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश

Next Post

३६४ अहवाल प्राप्त; ३२ पॉझिटीव्ह, २० डिस्चार्ज, एक मयत

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अहवाल पॉझिटीव्ह

३६४ अहवाल प्राप्त; ३२ पॉझिटीव्ह, २० डिस्चार्ज, एक मयत

धान्य

सार्वजनिक वितरण व्यवस्था; माहे सप्टेंबरचे धान्य वाटप परिमाण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.