तेल्हारा (प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तेल्हारा नगर परिषद च्या वतीने बेलखेड रस्त्यालगत बांधण्यात येत असलेल्या सामाजिक सभागृहाला देण्याबाबत २४ ऑगस्ट ला शिवप्रेमी नागरिकांनी नगराध्यक्षा सह पालिकेच्या नगरसेवकांना निवेदन देऊन मागणी केली आहे. तेल्हारा नगर परिषद च्या वतीने बेलखेड रस्त्यालगत सभागृहाची निर्मिती होत आहे या सभागृहाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन त्यांनी बारा बलुतेदार व अठरा पगळ जातीच्या लोकांना सोबत घेऊन एक आदर्श राजा म्हणून ख्याती प्राप्त केली रयतेचे सुख दुःख हे आपले समजून सर्वांना समान न्याय देऊन राज्य केले त्यांची प्रेरणा व आदर्श इतरांनी घ्यावा त्यांच्या नावाच स्मरण होऊन सर्वांनी गावाचा कारभार चालावा या करिता सदर सभागृहाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे या करिता शिवप्रेमी नागरिकांनी तेल्हारा नगर परिषद च्या अध्यक्षा व नगरसेवकांना निवेदन देऊन मागणी केली आहे.