अकोला(प्रतिनिधी)- कोरोनामुळे अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली असून त्यामध्ये दिव्यांग असलेल्याची तर अधिकच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच आशेचा किरण म्हणून एका संस्थेने थेट दिव्यांगाच्या खात्यात आर्थिक मदत पाठवून मदत केली.
दिव्यांगासाठी आली अज्ञात व्यक्तीची मदत देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे कोरोनामुळे हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या व्यक्तींचे अंधत्व 100% आहे अशा व्यक्तींना दहा दिवसाच्या आत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 500रु मदत मिळाली आहे यामध्ये विकास गाडेकर ,राधिका घोराडे, गौतमी चव्हाण ,सुरेश ढोक ,नागेश उपरवट, महादेव तायडे, प्रशांत पाखरे ,स्वाती पाखरे ,जयश्री इंगळे, गणेश मुलनकर ,इत्यादी अंध असलेल्या बांधवांना राजकुमार भलिया व पूजा ध्यानी रा कल्याण मुंबई यांच्या पुढाकाराने थेट बँक खात्यामध्ये मदत मिळवून दिली. प्रहार सेवक जिल्हाध्यक्ष मोईन अली ,सौ अरुणा मोहन काकड, वैभव सारसे सूकळी नंदापूर राजकुमार यांनी मदतीचा हात दिल्याने त्यांचे आभार मानले कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये मदतीचा हात दिल्याबद्दल त्यांचे दिव्यांग बांधव त्यांच्या बद्दल आभार मानत आहोत तसेच सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत .