अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १०३ चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचाअहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण,अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी,पातूर व मूर्तिजापूर येथे चाचण्या झाला नाही तर तेल्हारा येथे ५५ चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे २२ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी २६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे चाचण्या झाल्या नाही, अशा प्रकारे दिवसभरात १०३ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ११८७२ चाचण्या झाल्या असून ६५२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.