अकोला – आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १७१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३४ अहवाल निगेटीव्ह तर ३७ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३६२५(२९८३+६४२) झाली आहे. आज दिवसभरात १६ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २६२५७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५५७४, फेरतपासणीचे १७४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५०९ नमुने होते. आजपर्यंत एकूण २६११९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २३१३६ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३६२५(२९८३+६४२) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज ३७ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १४ महिला व २१ पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर येथील ३१ जण, चरण गाव अकोला येथील दोन जण तर उर्वरित कृषी नगर व तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन पुरुष असून ते अासेगाव व तेल्हारा येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.
दोन मयत
दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात बोरगांव मंजू येथील ८७ वर्षीय पुरुष असून तो दि. २३ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर पोपटखेड, ता. अकोट येथील ८६ वर्षीय पुरुष असून तो दि. २२ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
१६ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा
शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
४०९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ३६२५(२९८३+६४२) आहे. त्यातील १४६ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ३०७० संख्या आहे. तर सद्यस्थितीत ४०९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.