• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शांतता समिती बैठक कोरोनाचे संक्रमण रोखणे; हीच खरी गणेश भक्ती- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Team by Team
August 20, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, उत्सव, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
जितेंद्र पापळकर
19
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोरोना संकटाच्या छायेत गणेशोत्सव साजरा करताना आपण सारे कायदा सुव्यवस्था तर राखणारच आहोत, मात्र माणसाचा जीव वाचवणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखणे हीच गणेशाची भक्ती मानून आपण गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, सहाय्यक धर्मदाय आयुक्त सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष मोतिसिंग मोहता, कार्याध्यक्ष संग्राम गावंडे, सचिव तथा नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, तसेच विविध मंडळांचे पदधिकारी, शांतता कमिटी,मोहल्ला कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी गणेशोत्सव व मोहर्र्म यासंदर्भात शासनाच्या सूचनांचे वाचन करून उपस्थितांना अवगत केले. सहा. धर्मदाय आयुक्त सोनवणे यांनी गणेश मंडळांच्या सार्वजनिक न्यास नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती दिली. यावेळी नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांनी सर्व मंडळे शासनाच्या सूचनांचे पालन करतील, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करतील,अशी प्रशासनाला ग्वाही दिली. तसेच मोतिसिंग मोहता यांनीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे,असे आवाहन केले. तसेच मंडळांना आवश्यक सुविधा पुरवाव्या अशी मागणी केली. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी गणेशोत्सव व मोहर्र्म या काळात जिल्ह्यात अंमलात असणाऱ्या पोलीस बंदोबस्त व कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती देऊन मंडळाचे पदाधिकारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. या उत्सव काळात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे, असेही आवाहन केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करत असताना कोरोनाचे संकट कायम असल्याची जाणीव कायम ठेवा. कायदा सुव्यवस्था राखत असतांना लोकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या भागातील लोकांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, अन्य आजारग्रस्त लोकांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट, आर.टी. पी. सी. आर. चाचण्या करून घ्या. आपल्याकडे गंभीर कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाजमा संकलन केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी प्लाजमा दाते मिळवून देण्यात आरोग्य यंत्रणेला मदत करा.त्यासाठी प्रचार, प्रसार करा. प्रत्येक मंडळाने प्लस ऑक्सिमिटर घेऊन आपापल्या भागात लोकांची ऑक्सिजन पातळी मोजण्याचे काम करावे, गणेश स्थापना ते विसर्जन या कालावधीत होणारे गर्दीचे प्रसंग टाळून आपण आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करावे. कोरोनाचे संक्रमण रोखणे हीच खरी गणेश भक्ती होय, असे आवाहन त्यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: गणेशोत्सवजितेंद्र पापळकरजिल्हाधिकारी
Previous Post

अकोला ‘वंचित’च्या वतीने एसटीच्या वाहक चालकांचा सत्कार करीत प्रवास.

Next Post

204 अहवाल प्राप्त; 14 पॉझिटीव्ह, 63 डिस्चार्ज

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Corona Cases

204 अहवाल प्राप्त; 14 पॉझिटीव्ह, 63 डिस्चार्ज

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 201 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.