पातूर : (सुनिल गाडगे)
पातूर येथे १९ ऑगस्ट रोजी गणपती उत्सव तसेच मोहरम निमित्त शांतता तसेच सू व्यवस्था राहावी यासाठी पातूर पंचायत समिती हॉल येते शांतता समिती ची बैठक घेण्यात आली होती यामध्ये गणपती उत्सवा निमित्त नियम व अटी मधे करण्यात यावा.तसेच कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी या विषयी डॉ. रोहीणी सोळंके यांनी सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या अध्यक्ष्याना मार्गदर्शन केले..
तसेच पातूर चे ठाणेदार बायस ठाकूर साहेब यांनी सार्वजनिक गणपती उतस्वा निमित्त जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियम व अटी समजाऊन सांगितल्या… कारेक्रमला उपस्थिती म्हणून पातूर शहराचे तहसीलदार बाजड साहेब ,महावितरण चे DYE खुमकर साहेब ,पंचायत समितीचे विनोज शिंदे साहेब , राहुल उद्रे साहेब ग्रामविकास अधिकारी होते. कार्यक्रमाची प्रस्तावना भूषण कुऱ्हेकर साहेब यांनी केली तसेच आभार प्रदर्शन हे Psi गोरे साहेब यांनी केले. नियम व अटी पुढील प्रमाणे
१ ) ” श्री ” चे स्थापनेमुळे रहदारीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही . या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे .
२ ) स्थापनेची जागा अतिक्रमीत नाही तसेच स्थापनेच्या जमीन धारकाचं नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असायं .
३ ) मंडप हा ज्वालाग्रहीत पदार्थापासुन बनविल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी .
४ ) मंडळाचा दर्शनी भाग मुख्य रस्त्यापासुन आतमध्ये ठेवावा जेणेकरून प्रेक्षकांच्या गर्दीमुळे रहदारीस अडथळा निर्माण हाणार नाही .
५ ) मंडपाच स्टेज तीन फुट जमीनीपासुन उंच ठेवून समोरचा अडथळा तीन फुटापेक्षा उंच ठेवावा.जणकरुन रस्त्यावर्गन जनावरे आतमध्ये येणार नाहीत .
६ ) मंडपाचा उघडा दर्शनी भाग झाकता यावा म्हणुन मजबुत पडदा लावण्याची व्यवस्था करावी . ७ ) मुर्तीची उंची ०४ फुटापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी .
८ ) मंडळ तसेच ” श्री ” मुर्तीच्या सुरक्षेसाठी किमान २ स्वयंसेवक २४ तासांसाठी नेमणुक करावेत व त्यांची नांवे स्थापनेच्या दिवशी पोस्टे.ला दाखल करण्याची जबाबदारी मंडळाची राहील . ९ ) मंडळाचे कोणत्या पदाधीकारी / सदस्य यांचेकडून लकी ड्रा पध्दत अथवा लॉटरी याचा वापर करण्यात येणार नाही कारण कंट्रोल अन्ड प्राईज कॉम्पीटिशन अॅक्ट कलम ४ अन्वये तो दखलपात्र गुन्हा आहे .
१० ) हा उत्सव शांततेने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलिसांमार्फत ज्या ज्या वेळेस सभेकरीता बोलावील्या जाईल त्या – त्या वेळेस हजर राहण्याची जबाबदारी मंडळाचे सदस्य पदाधीकारी यांची राहोल सभेमध्ये देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन उत्सव पुर्णपणे शांततेने पार पडण्यासाठी शासन यंत्रणेस पुर्ण सहकार्य करावे .
११ ) मंडपात तात्पुरता विद्युत पुरवठा करण्यासाठी विद्युत मंडळाची आवश्यक ती कायदेशीर परवानगी घेण्यात यावी . विद्युत जोडणीमुळे अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वोतोपरी खबरदारी घ्यावी .
१२ ) आजुबाजुच्या चौकात भटकती जनावरे , लहान मुले , प्रेक्षक यांच्या जिवास धोका पोहोचु शकतो म्हणुन विद्युत रोषणाई कवळ मंडळा भोवती सुरक्षीतपणे करावी .
१३ ) रात्री १२.०० वा . नंतर संपूर्ण विद्युत रोषणाईतील इतर लाईट बंद करुन फक्त १ लाईट मंडपात सुरु ठेवुन अटीमध्ये नमुद केल्याप्रमाणे पडदा बंद करावा .
१४ ) गणपती मंडपामध्ये निजंतुकीकरण . थर्मल स्कॅस्नीग करून प्रत्यक्ष येवून दर्शन घेवू इच्छीणाऱ्या स्त्री व पुरुष भाविकांसाठी शारिरीक अंतराचे ( फिजीकल डिस्टन्सींग ) तसेच स्वच्छतेचे नियम ( मास्क , सॅनिटायझर इ . ) पाळुन दर्शनाकरीता स्वतंत्र व्यवस्था करावी . जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही . १५ ) मंडळाची नोंद धर्मदाय आयुक्त यांचे कार्यालयात करणे बंधनकारक आहे . १६ ) उत्सवाच्या काळात ध्वनीक्षेपकाच्या परवानगी करीता संबंधीत सक्षम अधिकारी यांचेकडे स्वतंत्र अर्ज करावा . १७ ) ध्वनीक्षेपक हा ५० डेसिबल पेक्षा जास्त राहणार नाही याची खबरदारी घ्यावी .
१८ ) लाऊडस्पीकर हा दिलेल्या वेळीच ( रात्री १०.०० वा ) बंद करण्यात यावा . लाऊडस्पीकर वाजविण्यास जे वेळेचे बंधन घालुन देण्यात आले आहे त्याचे तंतोतंत पालन करावे . १ ९ ) कोणत्याही परिस्थीतीत डि.जे. वाजविल्या जाणार नाही दक्षता घ्यावी .
२० ) पर्यावरण ( ध्वनीप्रदुषण ) संरक्षण कायदा १ ९ ८६ अधिनियमांचे उल्लघन केल्यास कलम १५ प्रमाणे १ लाख रुपये पर्यंत दंड व ५ वर्षाची शिक्षा किंवा अशा दोन्ही शिक्षा होण्याची तरतुद आहे .
२१ ) जनहित याचीका क्र .१७३ / २०१० ( डॉ.महेश बेडेकर विरुध्द महाराष्ट्र शासन व ईतर ) या याचिकेमध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी ध्वनी प्रदुषण ( नियंत्रण व नियमन ) नियम २००० ची अंमलबजावणी करणेबाबत दिनांक १३.०३.२०१५ रोजी निर्देशाची पुर्तता करणे बंधनकारक राहील .