अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 145 चाचण्यामध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण, बाळापूर, व पातूर येथे चाचण्या झाला नाही. अकोट येथे 36 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे 22 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 15 चाचण्या झाल्या त्यात तीघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे 35 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी 33 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे चाचण्या झाल्या नाही, अशा प्रकारे दिवसभरात 145 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 10728 चाचण्या झाल्या असून 560 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.