• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात आंदोलन केल्याने वंचितच्या पदाधिका-यावर विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल, हाच न्याय इतर पक्षाच्या आंदोलनास लावा – राजेंद्र पातोडे.

Team by Team
August 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
राजेंद्र पातोडे
13
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – शहरातील रस्त्याची चाळण झालेली आहे.गेली तीन वर्षे रस्त्याची कामे सुरु असल्याचा दिखावा करीत रस्त्याची निकृष्ट कामे केली जात असल्याने वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी रविवारी रस्त्यावर उतरले होते.जनहितासाठी झालेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यात काल वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत.लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात झालेल्या इतर सर्व राजकीय पक्षांच्या राजकीय आंदोलनाची माहिती पोलिसांना आहे.परंतु पोलीसानी इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनात सहभागी आंदोलका विरुद्ध गुन्हे दाखल केले नाही.केवळ आमच्या आंदोलकांना लक्ष करून पोलीस कार्यवाही केली आहे.आम्हाला लागणारा न्याय इतर पक्षाच्या आंदोलकांना लाऊन त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.राजकीय दबावाखाली केवळ वंचितला लक्ष करीत असतील तर हे सहन केले जाणार नसून पोलीस विभागाच्या दडपशाही विरुद्ध रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही पक्षाने दिला आहे.

शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत.अगदी कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण केल्या जाणा-या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.ह्या रस्त्यानी आणि रस्तेकाम सुरू असताना काही जीव देखील गेले आहेत.ह्या विरोधात रविवारी वंचीत बहुजन आघाडीने शहरातील ११ ठिकाणी सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलन केले.त्यावर सिटी कोतवाली, रामदास पेठ, सिव्हिल लाईन्स आणि अकोटफैल पोलीस स्टेशन मध्ये पक्षाच्या विविध पदाधिका-या विरोधात कलम १८८, १४३,२६९ सह १३५ आणि कोविड 19 साथ रोग नियंत्रण कायदा इतर कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत.जनहिताच्या मुद्द्यावर तुरुंगात जाण्याची पदाधिका-यांची तयारी आहे.तथापि लॉकडाऊन मध्ये आंदोलन करणे हा गुन्हा असेल तर ह्यापूर्वी जिल्ह्यात विनापरवानगी झालेल्या सर्व राजकीय आंदोलना मध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्ष आणि नेते तसेच जनप्रतिनिधी विरोधात गुन्हे दाखल केले गेले पाहिजे.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने ईमेल व्दारे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य सरकार कडे केली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ह्यापूर्वी राष्ट्र्वादीने बोगस बियाणा विरोधात कृषी अधिकारी कार्यालयात पेरणी केली आहे.काँग्रेसने हाच मुद्दा घेऊन महाबीज मध्ये ठिय्या आंदोलन दिले आहेआणि वीज बिल विरोधात वीज मंडळ कार्यालया समोर आंदोलन केले आहे.सेनेच्या वतीने दोनवेळा जिल्हाभर रस्ता रोको आणि जुतेमारो आंदोलने झाली आहेत.भाजपाने देखील दोनवेळा जिल्हाभर दूध दरवाढ व इतर मुद्द्यावर जवळजवळ ४२ ठिकाणी आंदोलन केली आहेत.कालही भाजपच्या उपमहापौर आणि काही पदाधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे.ह्या राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनाला पोलीस परवानगी नव्हती.मात्र एकाही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नाही.केवळ वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना लक्ष करून गुन्हे दाखल केले जात असतील तर पोलीस सत्ताधारी राजकीय पक्षाच्या हातचे बाहुले म्हणून काम करीत असल्याचे सिद्ध होईल.म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक ह्यांनी इतर राजकीय पक्षाची लॉकडाऊन मधील झालेली आंदोलनाची माहिती बोलवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत.अशी मागणीही राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.अन्यथा केवळ वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल केले जाणार असतील तर पोलीस विभागाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

भाजपचे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंटबाजी.

रस्त्याची अर्धवट बांधकामे आणि दुरुस्ती विरोधात काल भाजपच्या उपमहापौर आणि काही पदाधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या दिला.वंचितांच्या आंदोलनानंतर रस्त्याची चाळण झाल्याचा आणि गेली तीन वर्षे रस्त्याची बांधकामे अर्धवट असल्याचा साक्षात्कार भाजपला झाला आहे.भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री, स्थानिक आमदार आणि महापौर आहेत.जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आणि इतर आढावा बैठकीत आजवर त्यांनी कधीही रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात बोलल्याचे दिसले नाही.अधिका-यांना थेट दोषी धरता येण्याची संधी असताना भाजपचे खासदार आमदार महापौर आवाज उठवीत नाहीत.त्यामुळे कालचे ठिय्या आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट आहे.मनपाने केलेलया सिमेंट रस्त्याचे बांधकामाचा दर्जा ५० टक्के असल्याचा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे ह्यांनी केलेल्या सोशल ऑडीट मधून आला आहे.त्यानंतर देखील व्हीएनआयटी ने कोअर कटींग मशीनच्या सहायाने घेतलेल्या वीस नमुन्याचा अहवाल काय आला ? त्यावर मनपाने काय कार्यवाही केली ? त्याविरोधात भाजपवाले कधी ठिय्या देणार आहेत ? असा सवालही वंचितने विचारला आहे.

Tags: आंदोलनजिल्हा पोलीसरस्त्याच्या दुरावस्थे
Previous Post

महान धरण ९४.४४% भरले,  प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडले

Next Post

खाजगीकरण विदूयत कायदा 2020 च्या निषेधार्थ तेल्हारा येथे द्वारसभा संपन्न

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
द्वारसभा

खाजगीकरण विदूयत कायदा 2020 च्या निषेधार्थ तेल्हारा येथे द्वारसभा संपन्न

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 145 चाचण्या, 23 पॉझिटिव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.